Belagavi

कागवाड येथे विविध विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Share

कागवाड तालुका प्रशासन, नगर पंचायत, समाज कल्याण विभाग कागवाड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारी कागवाड येथील बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार श्रीमंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारामुळे भारतरत्न पुरस्काराचा सन्मान वाढला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले योगदान हे खूप मोठे आहे. त्यांच्या या योगदानामुळेच पुरस्काराचा सन्मान देखील वाढला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजासाठी मोठे योगदान दिले असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी जयपूर येथील बॉम्बशेफ राज्य प्रचार संयोजक सुभाष नाटेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात त्यांनी महापुरुषांनी दिलेल्या योगदानाबद्दल सांगितले. या महापुरुषांच्या तत्वांचे पालन आपण आपल्या जीवनात अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आमदारांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले .

यावेळी कागवाड तहसीलदार राजेश बुर्ली, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी विरनगौड एगनगौडर, विभागीय शिक्षणाधिकारी एम आर मुंजे, सीडीपीओ संजीवकुमार सदलगी, पीएसआय बी एम रबकवी, कागवाड नगर पंचायत मुख्याधिकारी एम एस सन्नगौडर, सुभाष कठारे, वकील अमित दीक्षांत, शिवाजी कांबळे, प्रकाश चौगुले, सचिन कवटगे, काकासाब चौगुले, रवी पाटील, रमेश चौगुला, ज्योतीकुमार पाटील, बाळू कांबळे, अविनाश देवणे आदींसह ज्येष्ठ व्यक्ती, दलित नेते, महिला उपस्थित होत्या.

Tags: