अज्ञात मारेकऱ्यांनी युवकाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना नाझर कॅम्प वडगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे वडगाव परिसरात एकच खळबळ माजली आहे.

वडगाव स्मशानभूमीपासून थोड्या अंतरावर असलेल्या नाझर कॅम्प येथे अज्ञात मारेकऱ्यांनी एका युवकाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. शंकर पाटील असे मृताचे नाव असून, तो वडगाव येथीलच यरमाळ रोडचा रहिवासी आहे. त्याचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर त्याला बाकावर बसलेल्या अवस्थेत सोडून मारेकरी फरार झाले आहेत. या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून शहापूर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


Recent Comments