Vijayapura

*रस्त्यांच्या नामकरणाला विरोध करणारे आदिलशाहाचे वंशज : बसनगौडा पाटील यत्नाळ:

Share

मुस्लिम राजांची नावे देण्यात आलेल्या रस्त्यांचे नामकरण करण्यात येत आहे. मात्र या नामकरणाला अनेकजण विरोध करत असून यासंदर्भात विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी प्रतिक्रिया नोंदविली असून विजापूर जिल्ह्यातील सर्व रस्त्यांना स्वातंत्र्य सैनिकांची तसेच मान्यवरांची नावे देण्यात आली असून याला विरोध करणारे हे आदिलशाहाचे वंशज असल्याची टीका केली आहे.

विजापूर शहरात अनेक रस्त्यांना नावे नाहीत. अनेक रस्त्यांना विविध नावाने ओळखले जाते. मात्र ठोस अशी नावे येथील मार्गांना देण्यात आली नसून येथील रस्त्यांना स्वातंत्र्य सैनिक, महनीय व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत. याला अनेकजण विरोध करत असून हे विरोधक आदिलशाहाचे पूर्वज आहेत, असे सांगत विजापुरातील अनेक मार्गांची त्यांनी नावे घेतली. या मार्गांना देण्यात आलेल्या महनीय व्यक्तींची नावे हि माझ्या आई वडिलांची नावे आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आंबेडकर सर्कल नजीक रस्त्याचे कनकदास मार्ग असे नाव देण्यात आले आहे. स्टेशन रोडला बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात आले आहे. गोदावरी हॉटेल नजीक असलेल्या मार्गाला बाबू जगजीवनराम यांचे नाव देण्यात आले आहे. अशा अनेक मार्गांचे नामकरण करण्यात आले असून आता बसस्थानक, आकाशवाणी मार्ग या मार्गांना अनेक महनीय व्यक्तींची नावे देण्यात आल्याचे ते म्हणाले. रस्त्याच्या नामकरणाला विरोध करणारे हे चोर आहेत, आदिलशाहाचे पूर्वज आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Tags: