बेळगाव तालुक्यातील काकती गावात राजरोसपणे मटका आणि गांजा प्रकरणे सुरु आहेत. या रॅकेटचा पर्दापाश करून हे गैरप्रकार रोखण्याचे आवाहन काकती ग्रामस्थांनी केले आहे.

काकती गावात दिवसेंदिवस गांजा प्रकरणे वाढत चालली आहेत. यात तरुण पिढी वहावत चालली आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन गैरप्रकारांकडे ओढली जात आहे. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांवरदेखील होत असून याचा समाजावरदेखील परिणाम होत आहे. अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पोलीस विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून हा प्रकार थांबवावा अशी मागणी काकती ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात महेश दंडीगी बोलताना म्हणाले, काकती गावात दिवसेंदिवस गांजा आणि मटका प्रकरणांमध्ये वाढ होत चालली आहे. सर्व ग्रामस्थांनी तसेच पोलिसांच्या सहकार्याने यावर रोख लावणे आवश्यक आहे. गांजामुळे अनेक कुटुंब उद्धवस्थ होत आहेत. तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. पोलीस विभागाने तातडीने हे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी सीपीआय यांच्याकडे केली आहे.
काकती गावात वाढत चाललेला गांजा आणि मटका प्रकार यावर रोख लावण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता असून या प्रकारामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. हा प्रकार तातडीने थांबविण्यासाठी पोलीस विभागाने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments