चेन्नईतील श्री अरूणोद्याम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे टिळकवाडीतील सविता चौगुले यांना विशेष मुलांची (गतिमंद) आई पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.

देशातील १५ मातांची निवड पुरस्कारासाठी करण्यात आली होती. त्यात कर्नाटकातून श्रीमती चौगुले एकमेव होत्या. चेन्नईत प्रमुख पाहुणे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण पार पडले. श्रीमती चौगुले या विशेष मुलांच्या आई आहेत. तसेच त्यांचे हृदय उजव्या बाजूला असल्याने त्या विशेष महिलाही आहेत.


Recent Comments