Belagavi

कल्लोळ्ळी येथे ग्रा. पं. सदस्याने साथीदारांसह केला महिलेवर हल्ला

Share

मूडलगी तालुक्यातील कल्लोळ्ळी या गावातील दोन कुटुंबामध्ये सुरु असलेल्या वादावादीत एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता घटप्रभा पोलिसांनी टाळाटाळ केली असल्याचा आरोप जखमी महिलेच्या कुटुंबीयांनी केलाय.

मूडलगी तालुक्यातील कल्लोळ्ळी या गावात क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबामध्ये वाद सुरु होता. शांतव्वा कामशेट्टी नामक महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याने त्याच्या सहकाऱ्यांसह मद्यपान करून महिलेवर हल्ला चढविला. जखमी शांतव्वाच्या डोक्यात गोळी घालून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शांतव्वाने केला आहे. यासंदर्भात घटप्रभा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यास गेले असता राजकीय दबावाखाली ग्राम पंचायत सदस्यावर कारवाई न करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतल्याचा आरोप शांतव्वाने केला आहे.

यावेळी शांताव्वाच्या भावाने प्रसारमाध्यमांना सांगितले कि, आपल्या बहिणीवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर शांतव्वा शुद्धीवर नसून डॉक्टरांनी तिच्या जगण्याची हमी दिली नसल्याचे शांतव्वाच्या भावाने सांगितले आहे. न्याय देण्या ऐवजी पोलिसांनी राजकीय दबावाला सहकार्य केले नाही, असा आरोप त्याने केलाय.

शांतव्वा सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली असून पोलिसांनी राजकीय दबावापोटी कारवाईचे पाऊल उचलण्यास टाळाटाळ करणे हे अयोग्य असल्याची चर्चा होत असून अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन शांतव्वाच्या कुटुंबीयांनी केले आहे.

Tags: