Belagavi

बेलगाम डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनतर्फे बॉडी बिल्डिंग स्पर्धा -मिस्टर रॉ क्लासिक आणि मिस्टर रॉ फिटनेसने गौरव

Share

बेलगाम डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनतर्फे २ एप्रिल रोजी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

धर्मवीर संभाजी उद्यान येथे बेलगाम डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा मिस्टर रॉ क्लासिक आणि मिस्टर रॉ फिटनेस अशा दोन विभागात विभागण्यात आल्या होत्या.यामध्ये ५५ किलो गटातील स्पर्धेत आकाश निगराणी, मंथन धामणेकर, रितेश लाखे, राजकुमार दुरवूगडे, जोतिबा बिर्जे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकाविला. तर ६० किलो गटात उमेश गंगाने, वेंकटेश ताशिलदार, प्रथम पाटील, मल्लिनाथ नागवी, नागराज मास्तमर्डी या स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकाविला. ६५ किलो गटात आदित्य काटकर, शिवकुमार पाटील, ओंकार गोडसे, सुजित हुद्दार, विनोद मेत्री यांनी तर ७० किलो गटात अक्षय रावल, महेश गवळी, सुनील पाटील, सुनील भातकांडे, संदीप पावले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकाविला. ७५ किलो गटात प्रताप कालकुंद्रीकर, अफरोज ताशिलदार, प्रसाद बाचीकर, रवी गाडीवड्डर, मुफीज मुल्ला या स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकाविला. ८० किलो गटात विशाल चव्हाण, गजानन काकतीकर, ओंकार कादेंनी, शशिधर किल्लेकर आदी स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकाविले. ८० हुन अधिक किलो गटातील शामनाथ गौडा, आकाश नेसरीकर, प्रतीक बाळेकुंद्री, दीपक बंस, सौरभ खन्नूरकर आदी स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक पटकाविले. बेस्ट पोझर म्हणून आकाश हरिकांत, उमेश गंगाणे, विनोद मेत्री, राजकुमार दुर्गुडे यांनी बहुमान पटकाविला तर लाईफ टाइम फिटनेस पुरस्काराने विशाल चव्हाण यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला गुन्हे अन्वेषण विभागाचे एसीपी एन व्ही बरमणी, लेफ्ट. क. धैर्यशील जगदाळे, उद्योजक सुहास सैबण्णावर, अजित सिद्दण्णावर, सुरेश चौगुले आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विजय चौगुले यांच्यावतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.,

Tags: