के रत्नाकर शेट्टी ट्रॉफी अंतर्गत बेळगावमध्ये क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर या संघाने बाजी मारली आहे. तर स्वप्नील येळवे हा मालिकावीर ठरला आहे.

विश्रुत स्ट्रायकर्स आणि अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर यांच्यामध्ये झालेल्या लढतीत अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर विजयी झाला आहे. अर्जुन स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकली. यानंतर विश्रुत स्ट्राईकर्स संघातील विजयकुमार पाटील या फलंदाजाने ३ चौकार, १ षटकार यासह ३२ चेंडूंमध्ये ४२ धावा घेतल्या. तर तेजस पवारने ४ चौकार आणि १ षटकार यासह २२ चेंडूंमध्ये २६ धावा घेतल्या. सुदीप सातेरी याने १६ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह २२ धावा घेतल्या. फरहान पाटील या गोलंदाजाने २७ धावा, ३ बळी, वसंत शहापूरकर याने २२ धाव, २ बळी तर ज्ञानेश होनगेकर याने १८ धावा आणि १ बळी घेत विश्रुत स्ट्राईकर्स या संघाने ११५ धावा केल्या.
तर अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने १२१ धावा घेत विश्रुत स्ट्रायकर्स संघाला पराभूत केले. या संघातील स्वप्नील येळवे, परीक्षित वक्कुंद या दोन्ही खेळाडूंनी सामना रंगवला. स्वप्नील येळवे याने ३ चौकार, ३ षटकार यासह ३४ चेंडूत ५९ धावा, आणि परीक्षित वक्कुंद याने ६ चौकार आणि १ शतकारासह ३७ चेंडूंमध्ये ५७ धावा घेत १० गडी राखून विजयाची ट्रॉफी मिळविली.
या स्पर्धेत स्वप्नील येळवे हा मालिकावीर ठरला असून सर्वोत्तम झेल घेणारा संतोष सुळगे पाटील, अधिकाधिक षटकार मिळविणारा स्वप्नील येळवे, प्रभावशाली खेळाडू फरहान पाटील म्हणून या खेळाडूंचा वाहिद शेख, मेहबूब सवनूर, चंदन कुंदरनाद, राहुल मगदूम आदी मान्यवरांच्या हस्ते विशेष पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.


Recent Comments