बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा पुन्हा एकदा उफाळून आली असून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्यात आल्यास स्वतंत्र गोकाक जिल्हा घोषित करण्यात यावा, अशी मागणी गोकाकच्या राजेंद्र संन्नक्की यांनी केली आहे.

विकासाच्या आणि प्रशासनात्मक दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक असल्याचे मत काही लोकप्रतिनिधी व्यक्त करत असून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास गोकाक स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. याचप्रमाणे मंत्री उमेश कत्ती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विभाजनासंदर्भात निवेदन सादर करणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. शिवाय बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात अनेक राजकीय नेते मंडळीही आता प्रतिक्रिया देताना दिसत असून पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा रंगत चालली आहे.
याच पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास गोकाक हा स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली असून यासंदर्भात गोकाक जिल्हा आंदोलक डॉ. राजेंद्र संन्नक्की यांनीही हि मागणी उचलून धरली आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास बेळगाव, गोकाक आणि चिकोडी अशा तीन विभागात जिल्ह्याचे विभाजन केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री आर. एच. पटेल यांनी यासंदर्भात चिक्कोडी, गोकाक आणि बेळगाव हे तीन जिल्हे करण्याची घोषणा केली होती. परंतु राजकीय दबावामुळे हि विभाजन होऊ शकले नाही. आता बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात लोकप्रतिनिधीच चर्चा करत असून आपण मंत्री उमेश कत्ती आणि आम लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे संन्नक्की म्हणाले. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास हे विभाजन गोकाक, चिकोडी आणि बेळगाव अशा विभागात होणे गरजेचे असून यासंदर्भात आपण जारकीहोळी बंधूंसोबत देखील चर्चा करणार असून सरकारवर स्वतंत्र गोकाक जिल्ह्याच्या मागणीसाठी दबाव टाकणार असल्याचे संन्नक्की यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांकडेही मागणीसाठी निवेदन सादर करणार असल्याची माहिती संन्नक्की यांनी दिली.


Recent Comments