देशातील आघाडीचे मेडिकल स्टोर मानल्या जाणाऱ्या वेलनेस फॉरेव्हर स्टोर चेनने बेळगांव शहरात उत्तम सेवा देत आपली यशस्वी वाटचाल पुढे सुरु ठेवली आहे. गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर आज संस्थेने आपल्या ९व्या शाखेचा कार्यारंभ अनगोळ रोड आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ केला.

उद्योजक भरत गुल्बानी, संतोष वाधवा, ऍड. विजयकुमार साखळे, ऍड. स्नेहवर्धन साखळे, मनोज गुप्ता, राजेश गंगवाणी, यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने अनगोळ शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी स्टोरचे मॅनेजर कपिल सुतार यांनी सांगितले कि, अनगोळच्या आसपासच्या जनतेला आम्ही २४ तास सेवा देणार आहोत. येथे फोन आणि व्हाट्सअँपद्वारे ऑर्डर दिल्यावर आम्ही सर्वप्रकारची औषधे घरपोच करणार आहोत. याबरोबरच गृहोपयोगी वस्तूही आम्ही येथे उपलब्ध करणार आहोत. कोणत्याही कंपनीची औषधे आम्ही लागलीच पुरवतो.
यावेळी अनामिका शिंदे यांनी आपली मराठीच्या माध्यमातून स्टोअरबाबत सविस्तर माहिती दिली. एरिया सेल्स मॅनेजर मृत्युंजय यादव म्हणाले कि, देशामध्ये ३००हुन अधिक वेलनेस स्टोअर्स आहेत. जनतेच्या सहकार्यातून सुमारे ८ शाखा बेळगावात सुरु केल्या असून ही ९वी शाखा आहे . आजपासून अनगोळ भागातही स्टोर सुरु झाले आहे. असाच पद्धतीने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
एकंदर आरोग्यसेवेत वेलनेस फॉरेव्हर जनतेची सेवा करण्याबरोबर उत्तरोत्तर प्रगती साधत जनतेच्या प्रशंसेला पात्र ठरली आहे.


Recent Comments