विजापुरातील जिल्हा पोलीस कवायत मैदानावर शनिवारी जिल्हा पोलीस कल्याण आणि ध्वज दिन साजरा करण्यात आला.

यावेळी पोलीस तुकडीने शानदार संचलनाद्वारे पाहुण्यांना मानवंदना दिली. धारवाड पोलीस प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य आणि निवृत्त पोलीस अधिकारी एन. बी. जाधव यांनी मानवंदना स्वीकारली. या प्रसंगी जिल्हाधिकारी पी. सुनीलकुमार, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एच. डी. आनंदकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. रामू अरसिध्दि यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments