Belagavi

बेळगावात धर्मवीर संभाजी महाराजांना आदरांजली

Share

 धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात आज त्यांना विविध युवक मंडळे आणि महिला मंडळांतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

होय, बेळगावात धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी शनिवारी गांभीर्याने पाळण्यात आली. स्वराज्य सेना युवक मंडळ आणि राजमाता महिला मंडळातर्फे लहान मुले, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी गांभीर्याने पाळण्यात आली. यावेळी स्वराज्य सेना युवक मंडळ आणि राजमाता महिला मंडळातर्फे धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

 

 

Tags: