Vijayapura

वाहकाने हाकलले; बाल सहायवाणीने तारले !

Share

बसपासची मुदत संपल्याने वाहकाने अकरावीची परीक्षा देण्यास निघालेल्या विध्यार्थ्यांना बसमधून रस्त्यातच उतरविल्याची घटना विजापूर जिल्ह्यात घडली.

: विजापूर तालुक्यातील उतनाळ येथे अकरावीची परीक्षा देण्यास निघालेल्या ७ विध्यार्थ्यांच्या बसपासची मुदत संपल्याने वाहकाने त्यांना बसमधून खाली उतरविले. हे विध्यार्थी मनगोळीहुन विजापूरला कॉलेजला जात होते. त्यानंतर या विध्यार्थ्यानी १०९८ या बाल सहायवाणी क्रमांकाला संपर्क साधून याची माहिती दिली. बाल सहायवाणीच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती मिळताच विध्यार्थ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. या सर्व ७ विध्यार्थ्यांना त्यांनी रिक्षा करून देऊन परीक्षा केंद्रावर पाठवले. त्यामुळे या विध्यार्थ्यांना वेळेवर आपापल्या कॉलेजमध्ये जाऊन परीक्षा देता आली. यात विजापूर सरकारी कॉलेजच्या ५ तर खेड कॉलेजच्या २ विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

Tags: