बेळगाव तालुक्यातील काकती येथे ‘हा माझा धर्म पशु बचाओ‘ संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांच्या संकल्पनेतून वृक्ष, पाणी, पक्षी आणि प्राणी बचाव जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

होय, काकती गावात प्राणीमित्र विनायक केसरकर यांच्या संकपनेतून डिव्हाईन हेल्पिंग हॅन्ड्स ग्रुपच्या व शालेय विध्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्ष, पाणी, पक्षी आणि प्राणी बचाव जागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत वृक्ष, पाणी, पक्षी आणि प्राणी यांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. वन कर्मचारी, ग्रापं सदस्य, ,आजी जिप सदस्य आणि ‘हा माझा धर्म पशु बचाओ’ संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. रॅलीत काकतीमधील मराठी, कन्नड, उर्दू तसेच मराठा मंडळ काकती शाखेचे विध्यार्थी सहभागी झाले होते.
विनायक केसरकर, गजानन गवाने, ज्योति गवी, सिद्धगौडा सुनगार, रुद्रेश, कामांना चौगुले, सुरज कडोलकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Recent Comments