जांबोटी रोड कॉर्नर ते बामणवाडी गावापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बेळगाव तालुक्यातील किणये ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या जांबोटी रोड कॉर्नर ते बामणवाडी गावापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. बेळगाव-गोवा राज्य महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र या रस्त्याशेजारील उद्योग-कारखान्यांमुळे येथून दररोज होणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे हा रस्ता पार उखडला आहे. त्यामुळे येथून जाताना वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील शांताई वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांना, कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शांताई वृध्दाश्रमाच्या संचालकांनी केली आहे.


Recent Comments