Vijayapura

नागठाण : खुद्द प्रभागातील मतदारांनीच धुडकावून लावले आरोप!

Share

विजापूर जिल्ह्यातील नागठाण मतदार संघाच्या व्याप्तीतील महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १२ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या रवींद्र लोणी यांनी पत्रकार परिषद घेऊन या मतदार संघाचे आमदार डॉ. देवानंद चव्हाण यांच्यावर काही आरोप केले. यानंतर लोणी यांनी केलेल्या आरोपांवर खुद्द मतदार संघातील जनताच संतापली असून आमदारांनी विकासकामे केली असल्याचे सांगितले आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून विजापूर जिल्ह्यातील नागठाण महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ मधून निवडून आलेल्या रवींद्र लोणी यांची भाजपने प्रवक्ते म्हणून नेमणूक केली. यानंतर रवींद्र लोणी यांनी प्रभागातील विकासकामांचा अभाव असल्याचे कारण देत पत्रकार परिषद बोलाविली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या भागाचे आमदार डॉ. देवानंद चव्हाण यांच्यावर आरोप केले. परंतु हे आरोप चुकीचे असल्याचे या प्रभागातील जनतेने सांगत रवींद्र लोणी यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार नागठाण चे आमदार डॉ. देवानंद चव्हाण यांनी नागठाण मतदार संघात मूलभूत सुविधा पुरविल्या नाहीत. शिवाय या भागात विकासकामे राबविण्यात आली नाहीत. रस्ते, पिण्याचे पाणी, गटारी अशा कोणत्याही सुविधा या मतदार संघात पुरविण्यात आल्या नाहीत, येथील जनता समस्यांच्या विळख्यात अडकली असल्याचे रवींद्र लोणी यांचे म्हणणे आहे.

रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या या आरोपानंतर प्रभाग क्रमांक १२ मधील जनता संतापली आहे. डॉ. देवानंद चव्हाण यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे असल्याचे येथील जनतेचे म्हणणे आहे. आपल्या प्रभागाचे नगरसेवक कोण आहेत हे आपण अद्याप पहिले नाही. त्यांचे नाव केवळ रवींद्र लोणी आहे इतकेच आपल्याला माहित आहे, असे येथील जनतेने सांगितले आहे. आजवर आपल्या मतदार संघात आमदार देवानंद चव्हाण यांनी अनेक विकासकामे केली असून रात्रंदिवस आमदार आपल्या मतदारसंघासाठी कार्यरत असतात, असे येथील जनतेने सांगितले. () + ()

माजी नगरसेवकाने आमदारांवर केलेले आरोप माजी नगरसेवकांच्याच अंगाशी आलेले निदर्शनास येत असून विकासकामांवरून आमदारांना अडचणीत आणू पाहणाऱ्या माजी नगरसेवकांना पुन्हा प्रभागातील मतदारांचा रोष ओढवून घेण्याची वेळ आली आहे असेच या प्रकारावरून दिसून येत आहे. मतदारांच्या या भूमिकेनंतर आता रवींद्र लोणी कोणती भूमिका घेतात आणि यावर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल हे आता पाहावे लागेल.

Tags: