Belagavi

बेळगावात टिप्परच्या धडकेत मोटरसायकल चालक जागीच ठार

Share

भरधाव टिप्परने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला. हा भीषण अपघात आज सकाळी बेळगावातील पहिल्या रेल्वे गेटजवळ झाला 

बेळगाव तालुक्यातील बहाद्दरवाडी येथील रहिवासी 35 वर्षीय विजय परशुराम नाईक असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो कॅम्प परिसरात नोकरीला होता. आज बुधवारी सकाळी कामावर येण्यासाठी तो तिसऱ्या रेल्वे गेटजवळून बेळगावकडे येत असताना पहिल्या रेल्वेगेटजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या टिप्परने त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

त्यामुळे तो टिप्परच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. मृत विजय अलीकडेच ब्रह्मनगर येथे रहायला आला होता. वाहतूक दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळात पाठवून दिला. मृत विजयच्या मागे पत्नी, मुलगी, वडील असा मोठा परिवार आहे. वाहतूक दक्षिण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

 

Tags: