बेळगाव तालुक्यातील बामणवाडी येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तिभावाने प्रारंभ झाला.

भक्तांचा लाडका विठुराया आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम असा अखंड जयघोष करत बेळगाव तालुक्यातील बामणवाडी येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तिभावाने प्रारंभ करण्यात आला.
समाजसेवक माजी महापौर विजय मोरे आणि त्यांचा पुत्र अल्विन यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ज्ञानेश्वरी पूजनाने पारायण सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविक, वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments