खेळ हे माणसाच्या आरोग्याचे प्रवेशद्वार असून शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमितपणे खेळामध्ये व्यस्त राहिले पाहिजे. दिव्यांगांची इच्छाशक्ती आणि त्यांनी दाखविलेली आपल्यातील शक्ती हि सर्वांसाठी आदर्श आहे असे मत उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथनारायण यांनी व्यक्त केले.

बेंगळूरमधील बसव इंटरनॅशनल फाउंडेशन, कर्नाटक व्हीलचेअर बास्केट बॉल असोसिएशन, आणि बेळगाव जिल्हा दिव्यांग क्रीडा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळुरू येथील बेगल्स बास्केट बॉल क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या एस आर बोम्मई आणि डॉ. पुनीत मेमोरियल क्लब व्हीलचेअर बास्केट बॉल स्पर्धांचे उद्घाटन केल्यानंतर उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथनारायण बोलत होते.
यावेळी बोलताना अश्वथनारायण म्हणाले, शारीरिक सुदृढ होण्यासाठी खेळ हा महत्वाचा घटक आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा दिव्यांगांसाठी असल्या तरी आपल्या सर्वांसाठी हे प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई आणि कर्नाटक रत्न डॉ. पुनीत राजकुमार यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा पुढील पिढीसाठी नवा संदेश देती. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहायय करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. ()
या कार्यक्रमास कुडलसंगमचे बसव जयमृत्युन्जय स्वामी उपस्थित होते. यावेळी बोलताना स्वामीजींनी दिव्यांगांमध्ये असलेल्या उत्साहाचे कौतुक केले. ()
यानंतर कर्नाटक अल्पसंख्यांक विकास मंडळाचे अध्यक्ष मुक्तारहुसेन पठाण, बेळगाव ऑटोनगर येथील इंडस्ट्रियल एरिया असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. पंकजा रविशंकर, समाजसेविका दिव्या रामचंद्रशेट्टी, मोटिव्हेशन इंडिया संस्थेचे संचालक प्रवीणकुमार, अप्पू युवा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती, ऑलिम्पिक क्रीडापटू वेंकटेश, बसव इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष रविबसिव चौगुला, कर्नाटक व्हीलचेअर बास्केट बॉल असोसिएशनचे अध्यक्ष ली. सायमन, बेळगाव जिल्हा दिव्यांग क्रीडा संघाचे अध्यक्ष महांतेश होंगल, बेंगळुरू जागतिक लिंगायत महासभेचे शंभू बनकार, समता शाळेचे अध्यक्ष शंकर बागेवाडी, संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष नानागौड बिरादार, बेळगावमधील कोच वि एस पाटील, पंचांना, गौशिया, मनीषा होंगल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत बेळगावच्या संघाने बाजी मारली तर बेंगळूरमधील जीवन बिमा नगर च्या एबीडी टीमने रनर अप चा बहुमान मिळविला. यासह विजापूर, बागलकोट येथील संघांनीही उत्तम कामगिरी केली.


Recent Comments