बेळगावातील मठ गल्लीतील 108 चिक्कबस्ती पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात आयोजित पंचकल्याण महोत्सवानिमित्त शुक्रवारी शतमानोत्सव कार्यक्रम भक्तिभावाने प्रारंभ झाला.

शतमानोत्सव कार्यक्रमानिमित्त मठ गल्ली चिक्कबस्तीमध्ये शुक्रवारी बाहुबली आणि नवग्रह मूर्ती स्थापना भक्तिभावाने करण्यात आली. याद्वारे 3 दिवसांच्या शतमानोत्सव महोत्सवाला आज प्रारंभ झाला. णमोकार विधान, नवग्रह विधान आणि सर्वघोष प्रायश्चित विधान आदी धार्मिक विधिविधान आचार्य धर्मसेन मुनी महाराजांच्या सानिध्यात पार पाडण्यात आले. यावेळी बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. चिक्कबस्तीतर्फे त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. 
यावेळी बोलताना आराधना महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा गोरगौंड म्हणाल्या, जैन धर्मीयांसाठी हा एक महत्वाचा धर्म पर्व आहे. जैन धर्माच्या तीर्थंकरांनी अहिंसा परमोधर्माचा संदेश दिला आहे. त्याचा प्रसार व्हावा यासाठी 25 मार्चपासून 3 दिवस शतमानोत्सव महोत्सवाला आज चालना देण्यात आली आहे. धार्मिक विधींसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सवाल कार्यक्रमासाठी हत्ती आणि घोड्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी सहकार्य दिलेल्यांचे आभार मानले.
यावेळी बेळगाव तसेच ग्रामीण भागातून आलेले जैन श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments