Belagavi

रस्ते अपघाताबाबत बेळगावात कार्यशाळा

Share

 राज्यात दरवर्षी रस्ते अपघातात 11 हजार मृत्यू होतात तर 50 हजार व्यक्तींना अपंगत्व प्राप्त होते. त्यामुळे याबाबत सर्वानी सावधानता बाळगण्याची गरज आहे असे मतकट्स इंटरनॅशनलसंस्थेचे ज्येष्ठ कार्यक्रम अधिकारी मधुसूदन शर्मा यांनी सांगितले

बेळगावातील ईफा हॉटेलमध्ये शुक्रवारी पब्लिक अफेअर्स फौंडेशन आणि कट्स इंटरनॅशनल यांच्या वतीने रस्ते अपघातासंदर्भात एकदिवसीय जागृती कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात बोलताना मधुसूदन शर्मा म्हणाले, एकट्या कर्नाटकात रस्ते अपघातामुळे दरवर्षी 11 हजार लोकांना जीव गमवावा लागतो तर 50 हजार जणांना कायमचे अपंगत्व पत्करावे लागते. अपघातातील मृत आणि जखमींच्या कुटुंबियांनाही अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहन चालवताना सर्वानी वाहतूक नियम पाळून काळजी घेणे गरजेचे आहे. अवैज्ञानिक पद्धतीने बनविलेले रस्ते हेसुद्धा अपघातांचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अपघातप्रवण क्षेत्रांत अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे असे शर्मा यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पब्लिक अफेअर्स फौंडेशनच्या डॉ. अन्नपूर्णा रविचंद्र, परिवहन खात्याचे मुख्य सचिव राजेंद्र कटारिया, प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम, आरटीओ फेडरेशनचे अध्यक्ष अन्सार अहमद आदी यावेळी उपस्थित होते.

 

 

 

Tags: