Belagavi

बेळगावात धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन

Share

 छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांची दुष्ट औरंगजेबाने क्रूर हत्या केल्याच्या घटनेची आठवण म्हणून बलिदान मास पाळण्यात येतो. यानिमित्त बेळगावातील मराठा समाजातर्फे आज, बुधवारी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

होय, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांची दुष्ट औरंगजेबाने क्रूर हत्या केल्याच्या घटनेची आठवण म्हणून बलिदान मास पाळण्यात येतो. या बलिदान मासाच्या 21 व्या दिवशी आज बेळगावात मराठा समाज बांधवांच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराज यांच्याप्रमाणेच आजच्या युवकांत हिंदू धर्म रक्षणासाठी त्याग आणि बलिदानाची भावना निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना स्वामीजी यांनी, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनसंघर्षाची आणि हिंदू धर्मासाठी त्यांनी केलेल्या अत्युच्च त्यागाची माहिती दिली. औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराज यांची अत्यंत क्रौर्याने हत्या केली. त्याची आठवण, त्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून बलिदान मास पाळण्यात येतो. त्यानुसार आज सर्व धर्मभक्त, देशभक्तांसमवेत आज बलिदान मासानिमित्त धर्मवीर संभाजी महाराज याना अभिवादन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी धर्मवीर संभाजी महाराज चौकात मराठा समाजाचे बांधव आणि देव, देश अन धर्मभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Tags: