बेळगावातील जाधवनगर एनसीसी कार्यालयनजीक असलेल्या एका किराणा दुकानात अनधिकृत अवैध धंदे सुरू असल्याने स्थानिक भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

जाधवनगर येथे किराणा दुकानाचा परवाना घेऊन या दुकानातू नशा करण्याच्या विविध मादक पदार्थांची विक्री केली जाते. यामुळे या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थी येऊन या दुकानात मद्यप्राशन करण्यासाठी प्लास्टिक ग्लास द्या अशी मागणी केली जाते. याबरोबर उघड्यावरच मुलीही धूम्रपान करतात. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या महिला व मुलीना संकोच होत आहे.
या दुकानावर बंदी घालावी, त्याचा परवाना रद्द करावा या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी सोमवारी सकाळी मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.


Recent Comments