राज्यातील ज्या आयटीआय महाविद्यालयांनी ७ वर्षे पूर्ण केली आहेत अशा महाविद्यालयांना अनुदान देण्याची मागणी करत आज बेळगावमध्ये आयटीआय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी आंदोलन छेडले.

राज्यातील खाजगी आयटीआय महाविद्या प्रतिनिधींनी १ मार्च रोजी हुबळी मुरूसावीर मठ ते बेंगळूर येथील फ्रिडम पार्कपर्यंत पदयात्रा आयोजित केली आहे. फ्रिडम पार्क येथे आयटीआय महाविद्यालयाचे प्रतिनिधी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. १४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीदरम्यान आपल्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु अद्याप आश्वासन पूर्ण करण्याबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यामुळे आता राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आयटीआय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी आंदोलन छेडले.
या आंदोलनासंदर्भात माहिती देताना आयटीआय प्रशासन मंडळ संघाचे राज्य उपाध्यक्ष अडिवेश इटगी म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून आम्ही आयटीआय महाविद्यालये चालवीत आहोत. थॉमस अहवालानुसार ७ वर्षे पूर्ण केलेल्या महाविद्यालयांना अनुदान देण्यात येते. देशातील कौशल्य विकासाला पाठिंबा देण्यासाठी खाजगी महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. यानुसार आता महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे, यासाठी सरकारकडे आम्ही मागणी करत असल्याचे इटगी म्हणाले.
या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील विविध खाजगी आयटीआय महाविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


Recent Comments