कडोली ग्राम पंचायत हद्दीतील गुंजेनहट्टी गावच्या श्री होळी कामाण्णाचा यात्रोत्सवाला शुक्रवारी होळी पौर्णिमेदिवशी प्रारंभ झाला. येत्या मंगळवारपर्यंत ही यात्रा चालणार आहे.
देवस्की कमिटी, हक्कदार व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मुर्ती प्रतिष्ठापणा, अभिषेक झाल्यानंतर होळी उभारुन पाटील कुटुंबियांतर्फे नैवैद्य अर्पण केल्यानंतर पुजारी यल्लाप्पा पाटील यांना शेण्या मारून बोबल्या मारत पारंपारिक धार्मिक वातावरण आणी मोठ्या भक्तीभावाने विधिवत पुजनाने होळी पेटवुन प्रसाद वाटप केल्यानंतर मुख्य यात्रोत्सवाला सुरुवात झाली.यात्रोत्सवाला बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील दुचाकी, चारचाकीसह विविध वाहनातुन शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली. दिवसभर भाविकांची दर्शन ओटी भरणे, नारळ वाढवणे रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.

माजी ग्राम पंचायत अध्यक्ष राजु मायाण्णा, ग्राम पंचायत, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील, ऍड. शाम पाटील, यल्लाप्पा पाटील, प्रकाश पाटील, महादेव पाटील, देवाप्पा पाटील, बाळु पाटील, सचिन पाटीलसह सर्व देवस्कि कमिटी सदस्यांसह पोलीस खात्यातर्फे अत्यंत उत्तमरित्या नियोजन करुन यात्रा यशस्वि करण्यासाठी परिश्रम घेतले. भाविकानींही दर्शन झाल्यानंतर दूरवर शिवारामध्ये जागा मिळेल तेथे आपापले प्रसाद तयार करुन स्वीकारत होते. मुख्य रस्त्यावर दुतर्फा कोंबड्या, ओटी व पूजेचे साहित्य, रसवंतीगृहे, शितपेये, आइस्क्रिम, उपहार गृहे, खेळणी साहित्याचे स्टॉल्स लागले आहेत. विविध प्रकारचे पाळणे,मनोरंजनाचे खेळ व साहित्य मांडन्यात आले आहेत. ही यात्रा मंगळवारपर्यंत सुरू राहणार असल्याचे देवस्थानी कमिटी अध्यक्ष सुरेश पाटील यांनी कळविले आहे.


Recent Comments