सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधण्यात आलेल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिका अधिकारी दिरंगाई आणि दुर्लक्ष करत असल्याची तक्रार माजी तहसीलदार निवृत्त तहसीलदार एम ए मुल्ला यांनी केली आहे.

व्हॉइस : बेळगाव येथील रेव्हेन्यू कॉलनीमधील कणबर्गी येथील निवासी आपली मराठीशी बोलताना म्हणाले, या विभागातील प्लॉट क्रमांक ५६ शेजारी असलेल्या प्लॉट क्रमांक ५५ मध्ये एस एस तावरगेरी यांनी सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. सदर बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचा आरोप माजी तहसीलदारांनी केला आहे.
याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवाय धारवाड उच्च न्यायालयाने अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला आहे. पालिका आणि सर्व्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला अहवाल दिला आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शिवाय सर्व कागदपत्रेही अधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत. हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी माजी तहसीलदारांनी केली आहे.
एस एस तावरगेरी यांनी सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमणासंदर्भात माजी तहसीलदार एम ए मुल्ला यांनी आक्षेप घेत सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात न्यायालयाचा आदेश येऊनही पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


Recent Comments