रशिया–युक्रेनमधी युद्ध थांबविण्यासाठी जगातील देशांच्या प्रमुखांची बैठक घेऊन प्रयत्न करण्याचे आवाहन बेळगावातील वकील आणि नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. याबाबत मोदींच्या नावचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

पंतप्रधान मोदी जागतिक नेते आहेत. जगातील सगळे देश त्यांना मान देतात. त्यामुळे तिसरे महायुद्ध होऊ न देण्यासाठी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. कोरोनामुळे जगातील लोक संकटाचा सामना करत आहेत. तशातच रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अन्नधान्य आणि बांधकामाच्या व अन्य आवश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सगळ्याच देशांतील लोक आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत. त्यामुळे सर्व देशांच्या प्रमुखांची बैठक घेऊन हे युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मोदींना या निवेदनात करण्यात आले आहे.
यावेळी ऍड. व्ही. आय. महांतशेट्टर, के. के. यादगुडे, अण्णासाहेब घोरपडे, वाय. के. दिवटे, एस. सी. मोदगेकर तसेच नागरिक उपस्थित होते.


Recent Comments