Belagavi

बेळगावात प्रशिक्षणप्राप्त पोलिसांचे दीक्षांत संचलन

Share

बेळगावातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११व्या तुकडीतील प्रशिक्षणप्राप्त पोलिसांचे दीक्षांत संचलन आज उत्साहात पार पडले.

होय, प्रशिक्षणप्राप्त नागरी पोलिसांच्या ११ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा बेळगावातील पोलीस कवायत मैदानावर बुधवारी सकाळी उत्साहात पार पडला. यावेळी प्रशिक्षणप्राप्त नागरी पोलिसांनी शानदार पथसंचलन सादर केले. राष्ट्रध्वजाला साक्षी ठेवून त्यांनी कर्तव्याची शपथ घेतली.

यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिसांना उद्देशून बोलताना प्रमुख पाहुणे बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी एन. सतीशकुमार म्हणाले, पोलीस यंत्रणा केवळ आपल्या देशात किंवा राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे. पोलिसांच्या या जगात पदार्पण करणाऱ्यांचे मी स्वागत करतो. पोलीस शिपाई हा संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या पाठीचा कणा आहे. येथून बाहेर पडल्यावर तुम्हाला ज्या पोलीस ठाण्यात नियुक्त केले जाईल, तेथे प्रामाणिक सेवा बजावून अनुभव प्राप्त करा. ते तुम्हाला सेवाकाळात सदैव उपयोगी पडतील असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बेळगावसह पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, एसपी लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त एसपी महानिंग नंदगावी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

 

Tags: