Vijayapura

अंगणवाडीतील मुलांचे साहित्य लाटताना शिक्षिकेला पकडले

Share

अंगणवाडीतील मुलांसाठी साहित्य चोरताना शिक्षिकेला ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील नागठाण शहरात घडली.

होय, अंगणवाडी शिक्षिका संध्या जहागीरदार ही अंगणवाडीतील मुलांसाठी सरकारने पाठवलेले साहित्य चोरून बाहेर विकत होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. त्यामुळे नागरिकांनी पाळत ठेवून आज तिला रंगेहात पकडले. एका व्हॅनमध्ये साहित्य भरून जात असताना नागरिकांनी तिला रेड हॅन्ड पकडले. त्यानंतर या शिक्षिकेविरोधात नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी तक्रार केली आहे.

 

Tags: