Gokak

गोकाकमध्ये एकाच रात्रीत ३ घरे फोडली 

Share

3 घरांतील मिळून 3 लाख रुपये रोकड, 8 किलो चांदी आणि 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरटयांनी लांबविल्याची घटना गोकाक शहरात घडली आहे.

होय, गोकाकमधील लक्ष्मी वसाहतीतील 3 घरात एकाचवेळी चोऱ्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरटयांनी हातचलाखी दाखवत 3 घरांतील मिळून 3 लाख रुपये रोकड, 8 किलो चांदी आणि 6 टोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरटयांनी लांबविले आहेत. ज्येष्ठ पत्रकार दिलीप मजलीकर यांच्या घरासह एकूण 3 घरांमध्ये एकाच रात्रीत चोरी करण्यात आली आहे. चोरीच्या दृश्यांचे चित्रण येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. घटनास्थळी गोकाकचे पीएसआय वालीकर आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकाद्वारे आणि ठसेतज्ज्ञांना बोलावून चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या साखळी चोरीच्या घटनेमुळे गोकाक शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

 

 

Tags: