श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज सोमवारनिमित्त कपिलनाथाची आवळ्यापासून आरास साकारण्यात आली.

आज सकाळी विशेष रुद्राभिषेक करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. त्यावेळी ही आरास पाहून भक्तांनी आनंद व्यक्त केला. आरास साकारण्यासाठी सचिन आनंदाचे, गणेश देवर, राजू पाटील, संजय मणगूतकर, कल्लाप्पा ज्योते यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातखंडे, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, दौलत जाधव व सेवेकरी उपस्थित होते.


Recent Comments