Belagavi

ऑटो नगरात फायबर कारखान्याला आग

Share

मैदानात लागलेली आग फायबर कारखान्यात पसरल्याने कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचींघटना बेळगावातील ऑटो नगरात सोमवारी घडली.  

होय, ऑटोनगरातील विकास कंपोझिट नामक कारखान्याला सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास आग लागली. कारखान्याच्या शेजारील मैदानात प्रथम आग लागली. लहान प्रमाणात असलेली ही आग नंतर या कारखान्यात पसरली. त्यामुळे कारखान्यातील कच्चा माल जळून खाक झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी २ बंबांसह घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या भागात आगीच्या घटना वरचेवर घडत असल्याने कारखानदार चिंतेत आहेत. येथील मोकळ्या मैदानामुळे आगीच्या घटना घडत असून, आम्हाला त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत असल्याची तक्रार कारखानदारांनी केली आहे. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आगीचा पंचनामा केला.

 

 

Tags: