अथणी शहराबाहेरील झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचे पोलिसांच्या तत्पर मदतीमुळे जीव वाचल्याची घटना घडली.

अथणीतील करी मसुतीजवळ कार आणि दुचाकीमध्ये अपघात होऊन दुचाकीचालक गंभीर जखमी होऊन पडला होता. त्याचवेळी तेथून पोलिसांचे ११२ गस्तीवाहन जात होते. अपघात पाहून वाहन थांबवून पोलिसांनी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमी दुचाकी चालकाला तातडीने अथणी सरकारी इस्पितळात उपचारांसाठी दाखल केले. त्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळून त्याचा जीव बचावला. याकामी पोलीस कर्मचारी जी. एस. दोडमनी, पी. एस. मालगौडर आणि गिरिमल अजुर यांनी सहभाग घेतला. त्यांच्या या माणुसकीची लोकांनी प्रशंसा केली.


Recent Comments