Belagavi

काकती पोलिसांची तक्रारदारांनाच मारहाण

Share

बेळगाव तालुक्यातील होनगा येथे दोन समाजात झालेल्या संघर्षानंतर तक्रार देण्यास गेलेल्यांचे म्हणणे ऐकून घेता त्यांच्यावरच काकती पोलिसांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत होनगा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे

: बुधवारी रात्री होनगा गावातील २ समाजात किरकोळ करणावून वाद होऊन हाणामारी झाली. त्यात काही ग्रामस्थ जखमी झाले. याबाबत ग्रामस्थ काळ रात्री १० च्या सुमारास तक्रार देण्यासाठी काकती पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेताच त्यांच्यावरच हल्ला केल्याचा आरोप करून   आपल्याला न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

याबाबत माहिती देताना एका ग्रामस्थाने सांगितले की, होनग्यातील घटनेसंदर्भात आम्ही काकती पोलीस ठाण्यात गेलो असता, आमचे म्हणणे ऐकून न घेताच पोलिसांनी आम्हाला आत टाकून मारहाण करण्यास प्रारंभ केला. आम्ही मारहाण का करताय असे विचारले. पण त्याला उत्तर न देताच पोलिसांनी परशुराम, हणमंत, भैरू, लक्ष्मण बजंत्री आणि मला ककती पोलिसांनी मारहाण करून जखमी केले असे त्यांनी सांगितले.

हल्ल्यात जखमी झालेले परशुराम यल्लाप्पा बजंत्री यांनी सांगितले की, काल आमच्या मुलांचे भांडण झाले होते. त्यांनी फोन करून सांगितल्यावर आम्ही तक्रार देण्यासाठी काकती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो होतो. तेथे आमचे म्हणणे ऐकून न घेताच पोलिसांनी आम्हाला मारहाण केली आहे. आम्ही दलित आहोत म्हणून पोलिसांनी अशी मारहाण करणे चुकीचे आहे. चौकशी करून, विचारून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी पोलिसांनी थेट मारहाणच केली आहे. त्यामुळे पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे असे सांगितले.

तक्रार देण्यास गेलेल्या तक्रारदारांनाच काकती पोलिसांनी मारहाण केली आहे. त्यामुळे दलितांना मारहाण करणाऱ्या काकती पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होनगा ग्रामस्थांनी केली आहे. यावर जिल्हा प्रशासन आता काय कारवाई करणार हे पहावे लागेल.

 

Tags: