Belagavi

बेळगावात पहिल्या रेल्वे गेटजवळील कामांना प्रारंभ

Share

 रेल्वे खात्यातर्फे बेळगावात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मंगळवारी टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे गेटजवळील दुसऱ्या टप्प्यातील कामांना प्रारंभ करण्यात आला

होय, बेळगावात रेल्वे खात्यातर्फे मार्ग दुपदरीकरणासह विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मंगळवारी पहिल्या रेल्वे गेटजवळील दुसऱ्या टप्प्यातील कामना प्रारंभ करण्यात आला. रेल्वे गेट बंद करून सकाळी ८ वाजल्यापासून हे काम सुरु करण्यात आले. गेट बंद ठेवल्याने मंगळवारी दुसऱ्या रेल्वे गेटजवळ काहीवेळा वाहतूक कोंडी झाली. बॅरिकेड्स लावून पहिले रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. तिसऱ्या रेल्वे गेटजवळही काम सुरु असल्याने दुसऱ्या रेल्वे गेटवर वाहतुकीचा अधिक ताण आला. मिरज ते लोंढा या दरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्यात येत आहे. वेगवेगळ्या टप्प्यात हे काम करण्यात येत आहे. बेळगाव ते खानापूर टप्प्यातील काम सध्या प्रगतीपथावर आहे.

 

Tags: