Belagavi

बेळगावात भरतेश हायस्कुलमध्ये एअरो मॉडेलिंग शो

Share

बेळगावातील डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कुलमधील अटलजी टिकरिंग लॅबच्या वतीने बुधवारी मोतीचंद लेंगडे भरतेश पॉलिटेक्निकच्या आवारात एअरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले.  

बेळगाव शहरातील प्रतिष्ठित भरतेश शिक्षण संस्थेचे पदाधिकारी राजीव दोड्डण्णावर, विनोद दोड्डण्णावर आणि श्रीपाल खेमलापुरे यांच्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाखाली डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कुलमधील अटलजी टिकरिंग लॅबच्या वतीने बुधवारी मोतीचंद लेंगडे भरतेश पॉलिटेक्निकच्या आवारात एअरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट एअरो मॉडेलर म्हणून पुरस्कार मिळवलेल्या विशाल भारती यांचे मार्गदर्शन त्यासाठी लाभले. भरतेश शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतील ४०० हुन अधिक विध्यार्थ्यानी हे प्रदर्शन पाहून आनंद लुटला. 

अटल टिकरिंग लॅबचे जिल्हा संयोजक नितीन रेवणकर आणि विजयकुमार हन्नीकेरी यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर झाले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी भरतेश शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक एस. एन. लक्ष्मी आणि अनुराधा तिगडी यांचे प्रोत्साहन लाभले.

यावेळी मोतीचंद लेंगडे भरतेश पॉलिटेक्निकचे प्राचार्य तुळशीगेरी, चेतन बोगार, धीरज जक्कन्नावर, सुनील गवस, एम. बी. चौगुले, सरिता पाटील यांच्यासह संस्थेचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: