Belagavi

मुंबईतील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे यश

Share

बेळगावातील कंप्लिट कराटे डो अकॅडमिच्या कराटेपटूंनी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकून बेळगावच्या नावलौकिकात भर घातली आहे.

मुंबईतील मालाड येथे आयोजित केलेल्या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगावातील कंप्लिट कराटे डो अकॅडमिच्या कराटेपटूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. या राष्ट्रस्तरीय कराटे स्पर्धेत विविध ठिकाणच्या 1200 कराटेपटूंनी भाग घेतला होता. हसन इस्माईल यांच्याहस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले. या स्पर्धेत बेळगावच्या कंप्लिट कराटे डो अकॅडमीचे किशन तेग्गीनकेरी, आयुष्य निरव, विहान लक्कशेट्टी, ओंकार रावळ, ऋषिकेश सनदी आदी कराटेपटूंनी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कराटेपटू सराव करीत आहेत. 

 

 

Tags: