Belagavi

जेएनएमसी येथील शिवालयात विशेष अलंकार पूजा महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक विधींचे आयोजन

Share

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नेहरू नगर परिसरात जेएनएमसी महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शिवालयात देवस्थान प्रशासनाच्या वतीने विशेष पूजा विधींचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली असून पहाटेपासून भक्तांनी दर्शनास्तही रीघ लावली आहे.

या देवस्थानात मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह जनतेनेही दर्शनाचा लाभ घेतला. या देवस्थानाला विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनीही कुटुंबासमवेत येऊन दर्शन घेतले.

यावेळी जेएनएमसी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. महंतशेट्टी यांनी सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या. दरवर्षी या देवस्थानाची आकर्षक सजावट करण्यात येते. महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक विधींचेही आयोजन करण्यात येते. याठिकाणी मोठ्या संख्येने भक्त दर्शनास्तही येतात, असे ते महंतशेट्टी यांनी सांगितले.

महाशिवरात्रीनिमित्त देवस्थानासंदर्भात माहिती देताना देवस्थानचे पुजारी म्हणाले, गेल्या २ वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे देवस्थान बंद होते. कोणतीही विशेष पूजा यादरम्यान आयोजित करण्यात आली नाही. मात्र यंदा कोरोनाचे सावट काही प्रमाणात कमी झाले असून महाशिवरात्रीनिमित्त आज विशेष पूजा, धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात प्रशासकीय मंडळ आणि अनेक भक्तगण सहभागी होतात असे ते म्हणाले.

मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी रक्षित मुनवळ्ळी याने प्रतिक्रिया देताना सांगितले कि, देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजाविधींचे आयोजन करण्यात येते. यामध्ये २० हजाराच्या आसपास भक्त सहभागी होतात. मेडिकल कॉलेजचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक देखील या कार्यक्रमात सहभागी होतात. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते अशी माहिती मुनवळ्ळी या विद्यार्थ्याने दिली.

बेळगावमधील अनेक शिवालयांमध्ये आज महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचेही पाहायला मिळाले. जेएनएमसी आवारात असलेल्या या शिवालयात देखील भक्तांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

Tags: