Belagavi

दक्षिण काशीत महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजा

Share

बेळगाव शहरातील दक्षिण कशी म्हणून परिचित असलेल्या श्री कपिलेश्वर देवस्थानात आज महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजा, धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री कपिलेश्वर देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त मंदिर आणि परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्राचीन काळापासून महत्व असणाऱ्या या मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रीघ लावली आहे. मंदिराचा गाभारा आणि सभामंटप आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजविण्यात आले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांसाठी मंडपाची उभारणी करण्यात आली असून कोविड सुरक्षेसंदर्भात सूचना देण्यात येत आहेत. मंदिरात सोमवारी मध्यरात्रीपासून विविध पूजा विधी आयोजित करण्यात आल्या आहेत.

Tags: