मंगळवारी होणाऱ्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने विजापूरमधील शिवालये सजविण्यात आली आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने प्रत्येक शिवालयात दर्शन घेताना पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर विजापूरमधील शिवगिरी येथे मात्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी साधेपणात महाशिवरात्री साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विजापूरमधील सर्व देवस्थाने, मंदिरे आणि शिवालये आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष पूजा, धार्मिक विधी, अभिषेक असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. शहराच्या बाहेर असलेल्या शिवगिरी येथे गेली १६ वर्षे मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदाची महाशिवरात्री साधेपणात आचरणात आणण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.
शिवगिरीचे प्रभारी टी के पाटील (बेनकट्टी) चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यंदाची महाशिवरात्री श्रद्धा आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रुद्र मृत्युंजय होम करण्यात येणार आहे. मंगळवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहाटे ४.३० वाजता काशी विश्वनाथला रुद्राभिषेक , भस्मार्चन, बेलार्पण, पुष्परचना असे विविध धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. यानंतर शेहनाई कार्यक्रम, ७ वाजता उत्सव ध्वजारोहण, ८.३० वाजता पूजा १० वाजता विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती सहसचिव आर. टी. पाटील यांनी दिली. दुपारी २ वाजता महिलांची ओटी भरणे कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वाजता रथोत्सव, यासह अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


Recent Comments