Vijayapura

ग्रापं सदस्यांचे मानधन वाढवेपर्यंत वाढीव वेतन घेणार नाही : सुनीलगौडा पाटील 

Share

 ग्राम पंचायत सदस्यांचे वेतन वाढवले नाही तर मलाही वाढीव वेतन नको अशी भूमिका विजापूरचे विधान परिषद सदस्य सुनीलगौडा पाटील यांनी घेतली आहे.

विजापूर येथे सोमवारी बोलताना एमएलसी सुनीलगौडा पाटील म्हणाले, २०२१ मध्ये झालेल्या एमएलसी निवडणुकीवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी ग्रापं सदस्यांचे मानधन वाढविण्यात येईल, केरळच्या धर्तीवर सुविधा देण्यात येतील असे आश्वासन दिले होते. मात्र मी आता त्यासंदर्भात सरकारला पत्र लिहिल्यावर, अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यावर अतिरिक्त आर्थिक भर उचलता येत नसल्याचे उत्तर सरकारने दिले आहे. असे असेल तर, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, सभापती यांचे वेतन वाढविण्यासाठी कुठून पैसा  आला? असा सवाल त्यांनी केला.

त्यासोबतच ग्रापं सदस्यांचे वेतन वाढवेपर्यंत मीसुद्धा वाढीव वेतन घेणार नाही अशी भूमिका सुनीलगौडा पाटील यांनी जाहीर केली.     यावेळी डॉ. महांतेश बिरादार उपस्थित होते.

 

Tags: