बेळगाव जिल्ह्यात सरकारने करावयाच्या कामांसंदर्भात आणि प्रसिद्ध साहित्यिक, कलाकारांच्या नावे ट्रस्ट स्थापन करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा कन्नड संघटना कृती समिती आणि कलाकारांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेंगळुरातील आरटी नगरातील निवासस्थानी कृती समिती अध्यक्ष अशोक चंदरगी आणि नाट्य कलाकार बी. एस. गविमठ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. मुख्यमंत्री बोम्मई यांनी निवेदन स्वीकारून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना अशोक चंदरगी यांनी, बेळगावात एकाच छताखाली सर्व सरकारी कचेऱ्या सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बहुमजली इमारत उभारावी, वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी 4 किमीचा उड्डाणपूल बांधावा, रामदुर्ग तालुक्यातील शबरीकोळ्ळचा विकास करून पर्यटन स्थळात रूपांतरित करावे, प्रसिद्ध नाट्यकर्मी एनगी बाळप्पा, कृष्णमूर्ती पुराणिक, डी. एस. कर्की, एस. डी. इंचल, प्रसिद्ध हिंदुस्थानी गायक पं. कुमार गंधर्व यांच्या नावे ट्रस्ट स्थापन करावा अशी मागणी केली. बाईट
यावेळी बेंगळूरचे कन्नडपर आंदोलक सी. के. रामेगौडा, शंकर हुगार, रमेश सोनटक्की, मैनुद्दीन मकानदार, शिवाप्पा शमरांत, वीरेंद्र गोबरी, बसवराज गार्गी, सुभाष एनगी, डॉ. बसवराज एनगी, विनयकुमार आदी उपस्थित होते.


Recent Comments