बेळगावातील वडगावमधील आनंदीबाई जोशी रुग्णालयात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला चालना देण्यात आली. ५ वर्षांखालील मुलांसह पोलिओ बुथवर येत पालकांनी मुलांना डोस पाजून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खाते यांच्या संयुक्त विध्यमाने रविवारी वडगावातील तालुका आरोग्याधिकारी कार्यालयाजवळील सरकारी आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहात पल्स पोलिओ अभियानाला चालना देण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी ५ वर्षाखालील बालकाला पोलिओ डोस पाजून अभियानाचे उदघाटन केले. फ्लो
यावेळी बोलताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ म्हणाले, जिल्ह्यात 5 वर्षांखालील 5 लाख 8 हजार 32 मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी हे अभियान आखले आहे. कोविड नियमावलीचे पालन करून ते राबविण्यात येत आहे. यासाठी 2380 बूथ स्थापन केले असून एकूण 9300 कर्मचारी तैनात केले आहेत. उद्या व परवा २ दिवस घरोघरी जाऊन डोस न घेतलेल्या मुलांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. एरव्ही वर्षातून दोनदा हे अभियान राबविण्यात येते. मात्र यंदा 27 फेब्रुवारी या एकाच दिवशी व्यापक प्रमाणावर हे अभियान राबविण्यात येत आहे. ते यशस्वी होण्यासाठी सर्वानी योगदान देण्याचे आवाहन डॉ. मुन्याळ यांनी केले.
यावेळी डॉ. तुक्कार, टीएचओ डॉ. शिवानंद मास्तिहोळी, पोलिओ नोडल अधिकारी रामस्वामी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, आरोग्य, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Recent Comments