राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्याहस्ते कुकडोळी गावात शुक्रवारी व्यायामशाळा बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले.

: भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने कुकडोळी हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. कुकडोळी आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा सदस्य कडाडी त्यांच्या अनुदानातून रुपये दहा लाख व्यायाम शाळेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. आज कडाडी यांच्या हस्ते व्यायामशाळेचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना इराण्णा कडाडी म्हणाले, माझ्याकडे अनेक जण मंदिरासाठी फंड द्यावा यासाठी येत असतात माझ्या मते असलेली मंदिरे स्वच्छ ठेवून भक्तिभावाने पूजा करून त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. त्याचबरोबर मनुष्य जन्मल्यानंतर त्याला अन्न लागते, चांगले आरोग्य लागते, चांगल्या शिक्षणाची गरज आहे. आणि म्हणूनच मी जास्तीत जास्त ग्रंथालय निर्माण करणे व व्यायाम शाळा निर्माण करणे यासाठी अनुदान देत असतो कुकडोळी ग्रामस्थांनी योग्य विचार करून व्यायाम शाळा बांधायचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. तरुणांनी व्यसनापासून लांब राहून आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 
या प्रसंगी भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, सरचिटणीस पंकज घाडी, बसवराज दमणगी, मंडळ सेक्रेटरी चेतन अंगडी, अण्णापा लखमोजी, चंद्राप्पा इटगी, शिवाप्पा भैरोजी , चंनमल्लय्या आजनवर, ग्रामपंचायत अध्यक्षा करेमा उच्चनावर, ग्रापं सदस्य रेखा बसर्गी, निलवा इटगी, भाजपा कार्यालय चिटणीस नारायण पाटील तसेच कॉन्ट्रॅक्टर शिवाजी चलवेटकर, बागेवाडी महा शक्ती प्रमुख सिद्धाप्पा हुकेरी आदी उपस्थित होते.


Recent Comments