नियंत्रण सुटल्याने मोटारसायकलवरून घसरून पडल्याने तिघे जागीच ठार तर एकाच इस्पितळात उपचारांवेळी मृत्यू झाला. ही दुर्घटना पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर संकेश्वरजवळ गुरुवारी रात्री घडली.

होय, भरधाव मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ती घसरून झालेल्या अपघातात तिघे जागीच ठार झाले तर एकाच इस्पितळात उपचारांवेळी मृत्यू झाला. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरनजीक महामार्गावर गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला. संकेश्वर येथील अनंत विध्यानगरातील रहिवासी 26 वर्षीय बसवराज माळी, 29 वर्षीय प्रवीण सनदी, 21 वर्षीय मेहबूब सेगडी आणि बेळगावच्या खंजर गल्लीतील रहिवासी 21 वर्षीय फरहान जमादार अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.
हे चौघेही गुरुवारी रात्री एकाच मोटारसायकलवरून कणगलेहून संकेश्वरकडे येत होते. संकेश्वरकडे येताच चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि मोटरसायकल घसरून ते बायपासवरून आपटून पडल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी संकेश्वरचे सीपीआय प्रल्हाद चन्नगिरी, पीएसआय गणपती कोगनोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. संकेश्वर पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Recent Comments