सहलीला जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची टेम्पो ट्रॅव्हलर्स उलटून झालेल्या अपघातात क्लिनर जागीच ठार तर काही विध्यार्थी जखमी झाले. हा अपघात विजापूर जिल्ह्यातील तालिकोटी तालुक्यातील कुचबाळ–बावूर दरम्यान झाला.

तालिकोटी तालुक्यातील जोकावी गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे 30 हुन अधिक विध्यार्थी आलमट्टी येथे टेम्पो ट्रॅव्हलर्स वाहनातून सहलीला जात होते. त्यावेळी टेम्पो ट्रॅव्हलर्स उलटून अपघात झाला. या अपघातात क्लिनर जागीच ठार झाला. दावलसाब सालवाडगी वय 40 असे मृत क्लिनरचे नाव आहे. अपघातात 15 हुन अधिक विध्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर तालिकोटी सरकारी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत तर काही विद्यार्थ्यांवर तमदड्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. शिक्षण खात्याची पूर्व परवानगी न घेताच ही सहल काढण्यात येत होती असे समजते. याबाबत तालिकोटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. अपघातामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.


Recent Comments