पीएसआयचा मुलगा आणि माजी नगरसेवकाची मुलगी यांच्यात झालेल्या प्रेमविवाहानंतर पीएसआयच्या मुलाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी चार आरोपींना विजापूरमधील गांधीचौक पोलिसांनी अटक केली आहे.

रौफ शेख या माजी नगरसेवकाची मुलगी अतिका आणि गांधीचौक पीएसआय रियाज कुडगी यांचा मुलगा मुस्तकिन कुडगी यांच्या प्रेमविवाहानंतर मुस्तकिन कुडगी याची हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकासह कॉन्ट्रॅक्ट किलर्सना गांधीचौक पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या मुलीवर प्रेम करून विवाह केल्याच्या संतापात हे कृत्य करण्यात आले आहे.
अतिकाचे वडील, माजी नगरसेवक रौफ शेख, त्यांचा मुलगा आणि इतर साथीदारांनी हि हत्या केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अतिका आणि मुस्तकिन यांचा विवाह ६ महिन्यांपूर्वी झाला होता. दरम्यान अतिका हि ५ महिन्यांची गर्भवतीही होती अशी माहिती समोर आली असून मुस्तकिन याची हत्या विजापूर शहरातील रेडिओ केंद्राजवळ करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे.
१५ फेब्रुवारी रोजी मुस्तकिनची सकाळी ८.३० चा सुमारास हत्या करून हा अपघात असल्याचे भासविण्यात आले होते. बोलेरो गाडीची धडक बसल्याने हा मृत्यू झाल्याचे चित्र तयार करण्यात आले होते. मात्र यापूर्वीच मुस्तकिन याची हत्या करण्यात आली होती हे पोलीस तपासात उघड झाले आहे. रौफ यांचा मुलगा आतिफ शेख, विलास राठोड, अनिल चौहान या चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून आरोपींमध्ये विलास रथिक आणि अनिल चौहान हे दोघेही कॉन्ट्रॅक्ट किलर असल्याचे समोर आले आहे. या दोघांच्या सहकार्याने अतिकाच्या वडिलांनी हा खुनाचा कट रचल्याचे माहिती मिळाली आहे, अशी माहिती एसपी आनंदकुमार यांनी दिली. (बाईट)


Recent Comments