लग्नगाठ ही स्वर्गात बांधली जाते’ असे मानतात. यालाच अनुसरून विजापूरमध्ये एक अनोखा विवाहसोहळा पार पडला आहे. एका मूकबधिर तरुणी आणि एका कानाने बधिर असलेल्या जोडप्याचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला असून हा विवाहसोहळा एका माजी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आहे.

विजापूरमधील या जोडप्याच्या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनाही आनंदाश्रू अनावर झाले. लग्नमंडपात वाढू-वरांच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनोख्या वधू वरांच्या विवाहसोहळ्याला उपस्थिती दर्शविलेल्या पाहुणे मंडळीला या विवाहसोहळ्याचे मोठे अप्रूप वाटत होते. आणि एका जोडप्याच्या नव्या संसाराची सुरुवात पाहून समाधान देखील व्यक्त करण्यात येत होते.
वधू-वर तरुण असले आणि प्रत्येक विवाहसोहळ्याप्रमाणेच हा विवाहसोहळा जरी पार पडला असला तरी या अनोख्या जोडप्यामुळे हा विवाहसोहळा विशेष ठरला होता. आपल्या मुलांच्या सहजीवनाला सुरुवात झालेली पाहून उभयतांच्या आईवडिलांचे डोळे आनंदाने आणि समाधानाने पाणावले होते.
बीए पदवीधर असलेली स्वप्ना ही विजापूरमधील आहे. सुजाता आणि शिवानंद रश्मी या दाम्पत्याची कनिष्ठ कन्या. आयटीआय शिक्षण घेतलेला विनायक हा हुबळी येथील प्रभावती चंद्रशेखर शिवप्पय्यांमठ यांचा तृतीय सुपुत्र आहे. स्वप्न ही मूकबधिर तर विनायक एका कानाने बधिर… शारीरिक अवयवांची कमतरता असली तरीही या तरुणांनी एकत्र जीवन जगण्यासाठी घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे.
स्वप्ना आणि विनायक या दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्या विवाहाची काळजी होती. मात्र गेल्या महिन्यात या कुटुंबियांच्या सहमतीने हा विवाहसोहळा पार पडला आहे. आपण घेतलेल्या विवाहाचा निर्णय हा आपल्यासाठी आनंददायी असल्याचे मत विनायकने व्यक्त केले आहे.
आपल्या विवाहासंदर्भात स्वप्ना देखील अत्यंत आनंदी असून ज्यांना आपल्यासारख्या समस्या आहेत, अशांनी आम्ही घेतलेल्या निर्णयाचा विचार करून आपल्या जीवनात पुढे जावे, असे मत स्वप्ना ने व्यक्त केले.
लग्नमंडपात जमलेल्या प्रत्येक पाहुण्यांनी वधू-वरांना शुभेच्छा देऊन त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले.


Recent Comments