जिल्ह्यातील शाळा–महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम आज बेळगावात आयोजित केला होता.

कन्नड पुस्तक प्राधिकरण, बेंगळूर यांच्यावतीने बेळगावातील बसवराज कट्टीमनी सभागृहात बुधवारी महसुली विभागातील विविध जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयाना मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. रामकृष्ण मराठे यांनी यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन केले. त्यानंतर बोलताना डॉ. मराठे म्हणाले, अनुभव मंटप आणि महामने कल्याण क्रांतीची २ महत्वाची केंद्रे होती. महामनेमध्ये अन्नदासोह चालायचा. तेथे अनेक मोठमोठे विद्वान, लिपिकार रहायचे. कन्नडनाडूच्या संस्कृतीची जीवशक्ती असलेले हे ग्रंथ वाटप करून दान करण्याची दासोह करण्याची परंपरा चालू रहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विविध शाळा-महाविद्यालयाना मोफत पुस्तके वाटण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सर्जू काटकर, डॉ. एम. एस. संदेश हांची, के. बी. किरणसिंग, संगमेष पुजारी आदी उपस्थित होते.


Recent Comments