Belagavi

सदाशिव नगर स्मशानभूमी विकासासाठी लिंगायत संघटनेचा पुढाकार

Share

बेळगावमधील सदाशिव नगर स्मशान भूमीत लिंगायत संघटना आणि समाज बांधवांच्या वतीने स्मशान भूमीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती.

सदाशिव नगर स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी समाज बांधवांनी जेसीबीच्या माध्यमातून स्वच्छता केली. लिंगायत संघटना आणि समाज बांधवांच्या वतीने सदर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती.

यावेळी रमेश कळसन्नवर यांनी बोलताना सांगितले कि, सदाशिव नगर स्मशानभुमीला पुरातन स्मशानभूमी बनविण्याच्या उद्देशाने आज स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्थानिक आमदारांच्या सहकार्याने स्मशानभुमीला कंपाउंड घालण्याचे काम करण्यात आले आहे. समाज बांधवांच्या सहकार्याने स्मशानभूमीच्या विकासाचे काम अधिक वेगाने होत असून इतर समाज बांधवांनीही या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन कळसन्नवर यांनी केले.

यावेळी बोलताना आणखी एका समाजबांधवाने सांगितले कि स्मशान भूमीत २००० साली प्लॉट पाडवण्याचा कट काहींनी रचला होता. भूखंड घशात घालण्याचा कट रचून आपल्यावर गुंडगिरी करून दबाव टाकण्यात आला. परंतु सर्वांच्या सहकार्याने आंदोलन उभे करून हि भूमी वाचविण्यात आम्हाला यश आले आहे. तत्कालीन आमदार रमेश कुडची यांच्या प्रयत्नातून स्मशानभुमीला संरक्षक भिंत घालण्यात आली असून स्मशानभूमीच्या विकासासाठी सर्व समाजबांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

स्मशानभूमीच्या विकासासाठी अद्याप अनेक कामे शिल्लक आहेत. स्मशानभूमीच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Tags: